Ad will apear here
Next
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला पुरस्कार
पुणे : गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला ‘ग्लोबल इनोव्हेटिव्ह स्कूल अवॉर्ड २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी,  सामाजिक जागरुकता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सांस्कृतिक कलाकृतींमधील समावेश या सर्व मापदंडांच्या आधारावर गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला बिट्स पिलानी दुबई कँपस येथे हा पुरस्कार देण्यात आला.  

‘गोयल गंगा’च्या मुख्याध्यापिका भारती भागवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शिवाय गोयल गंगा फाऊंडेशनच्या विश्वस्त सोनू गुप्ता यांना ‘सोनरी महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार २०१८’ हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी सोनू गुप्ता म्हणाल्या की, ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने नेहमीच समाजाला काहीतरी सकारात्मक देण्यासाठी प्रयत्नशील असते तसेच शाळेतून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या जगातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही कार्यक्षम बनवत असतो. शिवाय सातत्यपूर्ण प्रयत्नातून देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असतो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZYTBL
Similar Posts
‘गोयल गंगा’च्या विद्यार्थ्यांचे यश पुणे : दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल २९ मे रोजी जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. अंजली नायर हिला सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळाले आहेत. शाळेची एकूण टक्केवारी ८० टक्के आहे.
बावधन येथे पतंगोत्सव उत्साहात पुणे : गोयल गंगा फाउंडेशनकडून बावधन येथील गंगा लेजंड येथे पतांगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘संस्काराशिवाय जीवन म्हणजे भरकटलेले जहाज’ पुणे : जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९७ टक्के पुणे : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून, यात पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल ९७ टक्के लागला आहे. द्रीष्टी पेशवाणी हिला सर्वाधिक ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी सायन्स, तर २२ विद्यार्थी कॉमर्सचे आहेत. यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात डिस्टिंकशन मिळविले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language